राजमाची धबधबा

सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणाऱ्या डोंगररांगेमुळे निर्माण झालेला परिसर ‘उल्हास नदीचे खोरे’ म्हणून ओळखला जातो.याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते.याच ‘उल्हास नदीच्या खोऱ्यांच्या प्रदेशात मुंबईपुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस १५ कि.मी अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे.कल्याणा नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे.या बंदरापासून बोरघाटमार्गेपुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग.जसा नाणेघाट तसा बोरघाट,त्यामुळे या मार्गावरूनही मोठा प्रमाणात वाहतूक चालत असे.या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसूलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे.यापैकी सर्वात प्रमुख’ किल्ले राजमाची.किल्ल्याचा भौगोलिक दृष्टा विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाक चा किल्ला, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्टया एक प्रमुख ठाणं असले पाहिजे. किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय.
Leave a Reply