विशाळगड

विशाळगड

विशाळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस 76 कि.मी. अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री पर्वतरांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे.
ईतिहास

विशाळगडाची उभारणी इ.स. 1058 मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली. हा गड किल्ले खेळणा या नावाने देखील ओळखला जातो. साधारण इ.स.१४५० च्या सुमारास बहमणी राज्याचा एक सुभेदार हा प्रांत काबीज करण्यासाठी आला. हा सरदार म्हणजे मलीक उत्तुजार होय त्याने प्रथम पन्हाळ्या किल्ल्यावरील शिर्क्यांना जेरीस आणले. शिर्क्यांनी मलीक उत्तुजाराला विशाळगडाचे आमिष दाखवले. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मलीक उत्तुजारची सात हजाराची फौज विशाळगडाच्या निबिड अरण्यात येऊन दाखल झाली. अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलीक उत्तुजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला. शिर्के आणि मोरे यांनी कात्रीत सापडलेल्या मलीक उत्तुजारला सात हजार सैन्यासकट त्यांच्या आक्रमणापासून मुक्त केला. यासैन्यातील एक सरदार मलीक रैहान होता. त्याचीच कबर विशाळगडावर आहे असे जाणकारांचे मत आहे.

पुढे छ. शिवाजी महाराजांनी इ.स. 1659 मध्ये हा किल्ला जिंकला व याचे नामकरण केले विशाळगड ! विशाळगड हा मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासातील एका अचाट पराक्रमाचा साक्षीदार आहे आणि तो म्हणजे महाराजांची आदिलशाही सरदार सिद्दी जौहर याने टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका ! आणि यासाठी अवघे 300 मावळे घेऊन आठ तासांहूनी अधिक काळ हजारोंच्या फौजेला गजापूरच्या खिंडीत थोपवून धरणारे वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमाचा ! पुढे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छ. संभाजीराजांनी विशाळगडावर बराचसा काळ व्यतीत केला. त्यांनी या किल्ल्याची डागडुजी तसेच पुनर्बांधणीकडे विशेष लक्ष दिले.

कोल्हापूरच्या छत्रपतींचे पंतप्रधान पंत प्रतिनिधी हे विशाळगड येथे राहत असून ते विशाळगड चे जहागीरदार होते. त्यानंतर ते मलकापूर येथे राहावयास गेले.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

वाहनतळावरून गडाकडे जाण्यासाठी एकच वाट आहे. वाटेवरील लोखंडी पूल ओलांडल्यानंतर पायऱ्यांची चढण सुरू होते. चढताना ढासळलेला बुरूज दिसतात. साधारण 30 मिनिटे चालल्यानंतर आपण गडाच्या सपाटीवर येऊन पोहोचतो. गडावर “हजरत मलिक रिहान’ यांचा दर्गा आहे. दरवर्षी इथे हजारो भाविक भेट देतात. याशिवाय गडावर वीररत्न बाजीप्रभू देशपांडे आणि फूलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे. काळाच्या ओघात किल्ल्याची बरीच पडझड झाली असून सध्या गडावर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. या शिवाय छत्रपती राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी अंबीकाबाई यांचे स्मारक आहे.

 

गडावरील राहायची सोय

गडावर मलिक रेहान साहेब नामक अवलियाचा दर्गा आहे. हे एक जागृत देवस्थान असुन दररोज बरेच मुस्लीम व हिंदू भावीक या दर्ग्याला भेट देतात. त्यामुळे गडावर भाविकांना किंवा पर्यटकांना निवासासाठी खोल्या सहज आणी वाजवी किंमतीत उपलब्ध होवू शकतात.
गडावरील खाण्याची सोय

गडावर मलिक रेहान दर्ग्याच्या अवतीभवती छोट्या मोठ्या भरपूर खानावळी व हॉटेल्स असुन तिथे पर्यटकांच्या आवडीप्रमाणे शाकाहारी किंवा मांसाहारी भोजन उपलब्ध होवू शकते.
गडावरील पाण्याची सोय

गडावर पिण्याच्या पाण्याची एकच विहीर असुन ती देखील उन्हाळ्यात आटते. उन्हाळ्यात स्थानिक ग्रामस्थ पांढरेपाणी किंवा आंबा गावातून पाणी आयात करतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये इतर वापरासाठी मुबलक पाणी उपलब्ध नसते. परंतू पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत विशेष अडचण नाही. गडावरील बहुतेक दुकानांमध्ये किंवा हॉटेलात पिण्याचे पाणी मिळू शकते.
गडावर जाण्याच्या वाटा
मार्ग
शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथुन गजापूर मार्गे थेट विशाळगड्याच्या पायथ्यापर्यंत खाजगी वाहनाने जाता येथे अथवा आंबा येथून विशाळगडावर जाण्यासाठी वेगळा घाट रस्ता आहे. कोल्हापूरामधून या मार्गे कर्नाटक परीवहन मंडळाच्या दिवसातून चार बसेस विशाळगडापर्यंत जातात. दिवसातून काही वेळेस मलकापुरातून गजापूरमार्गे देखील एस.टी. महामंडळाच्या काही बसेस विशाळगडावर जातात.

date of birth

फणस

फणस

I am text block. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

मंत्रालयीन विभागामधील महत्वाच्या विविध शासकीय योजनेची माहिती

महाराष्ट्रातील व्होटिंग लिस्ट मध्ये नाव समाविष्ट करा किवां बदल करा

शेतमाल तारण योजना

शेतमाल तारण योजना

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना:

शेतकऱ्याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिकपातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे शेतीमालाचे काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजार पेठेत विक्रीसाठी येतो. साहजीकच शेतमालाचे बाजार भाव खाली येतात. सदर शेतमाल साठवणूक करुन काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालास जादा बाजार भाव मिळू शकतो. तेव्हा शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा या दृष्टीकोनातून कृषि पणन मंडळ सन 1990-91 पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे. या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, काजू बी, बेदाणा व हळद या शेतमालाचा समावेश करण्यात आलेला असुन या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकुण किंमतीच्या 75 टक्के पर्यंत रक्कम 6 महिने कालावधीसाठी 6 टक्के व्याज दराने तारण कर्ज देण्यात येते. सदर योजना बाजार समित्यांमार्फत राबविली जात असुन सहा महिन्यांचे आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना 3 टक्के व्याज सवलत देण्यात येते. या योजने अंतर्गत पणन मंडळाने सन 1990-91 ते 2015-16 अखेर पर्यंत एकुण रू. 15076.62 लाख इतके तारण कर्जाचे वाटप केलेले आहे.

शेतमालाचे प्रकारानुसार तारण कर्जाची मुदत व व्याजदर :-
 अ.क्रशेतमाल प्रकारकर्ज वाटपाची मर्यादामुदतव्याज दर
 1सोयाबीन, तुर, मुग, उडिद, चना, भात (धान) करडई, सुर्यफूल, हळद, ज्वारी, बाजरी, मका व गहूप्रत्यक्ष बाजारभावानूसार एकूण किंमतीच्या 75% रक्कम.६ महिने६ टक्के
 2काजू बीएकूण किंमतीच्या 75% रक्कम. (रु.50 प्रति किलो अथवा प्रत्यक्ष बाजार भावाची किंमत यापैकी कमी असेल ती रक्कम६ महिने६ टक्के
 3बेदाणाएकुण किंमतीच्या कमाल 50% किंवा जास्तीत जास्त रु. 50,000/- प्रति मे.टन यातील कमी असणारी रक्कम६ महिने६ टक्के
शेतमाल तारण कर्ज योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये, अटी व शर्ती खालीलप्रमाणे-
  • शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचाच शेतीमाल स्विकारला जातो. व्यापाऱ्यांचा शेतीमाल या योजनेअंतर्गत स्विकारला जात नाही.
  • प्रत्यक्षात तारण ठेवलेल्या शेतमालाची किमंत ही त्यादिवसाचे बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेली खरेदी किंमत यापैकी जी कमी असेल ती ठरविण्यात येते
  • तारण कर्जाची मुदत 6 महिने (180 दिवस) असुन तारण कर्जास व्याजाचा दर 6% आहे.
  • बाजार समितीकडून कृषि पणन मंडळास 3% प्रमाणे कर्ज व्याजाची परतफेड. (उर्वरीत 3% व्याज बाजार समितीस प्रोत्साहनपर अनुदान). मुदतीत कर्ज परतफेड न केल्यास व्याज सवलात नाही.
  • स्वनिधीतून तारण कर्जाचे वाटप करणाऱ्या बाजार समितीस तिने वाटप केलेल्या कर्ज रकमेवर 3 % प्रोत्साहनपर व्याज अनुदान.
  •  महिने (180 दिवस) मुदतीनंतर सहा महिन्यापर्यत 8 टक्के व्याज दर व त्याचे पुढील सहा महिन्याकरिता 12 टक्के व्याज दर आकारणी केली जाते. 6. तारण ठेवलेल्या शेतमालाची साठवणुक, देखरेख व सुरक्षा बाजार समिती विनामुल्य करते.
  • तारणातील शेतमालाचा विमा उतरविण्याची जबाबदारी संबंधीत बाजार समितीची राहते.

शेतकरी कर्जमाफी

नमस्कार मित्रानो…….

यादी बघत असतांनी बँक आणि ब्रांच हे ALL सिलेक्ट करावे, अन्यथा यादी दिसणार नाही याची नोंद घ्यावी. ज्यांचे कर्ज माफ झाले आहे त्या लाभार्थीचीच नावे तुम्हाला लाभार्थी यादी मध्ये पहायला मिळतील ज्या गावांची किंवा लाभार्थींची यादी दिसत नसणार त्यांची उर्वरित यादी टप्याटप्याने दिसणार आहे वाट पहा ह्याच APPS वर तुम्हाला लवकरच ती यादी दिसणार आहे.

शेवटी सर्वांचे धन्यवाद !

आपल्या प्रतिक्रिया द्या…. 

महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना समर्पित

या योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकरी ज्यांनी दि. १.४.२००९ नंतर पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतले व असे कर्ज दि. ३०.६.२०१६ रोजी थकीत आहे अशा शेतक-यांचे मुद्दल व व्याजासह रु. १.५० लाख या मर्यादेत कर्ज काही निकषाच्या अधिन राहून माफ करण्यात आले आहे. तसेच रु. १.५० लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता योजना (OTS) योजनेअंतर्गत रु. १.५० लाख एवढया रकमेचा लाभ देण्यात येणार आहे. तथापि, यासाठी अशा शेतक-यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण परतफेड बँकेस जमा केल्यानंतर शासनामार्फत रु. १.५० लाख अदा करण्यात येईल.

या योजनेमध्ये सन २०१५ -१६ व २०१६ -१७ या वर्षातील घेतलेल्या पीक कर्जाची दि. ३०.६.२०१६ व दि. ३०.६.२०१७ अनुक्रमे परतफेड केल्यास अशा शेतक-यांनाही पीक कर्जाच्या २५% अथवा रु. २५००० लाभ देण्यात येणार आहे. सदर योजनेमध्ये सन २०१२-१३ ते २०१५-१६ वर्षातील पुनर्गठन केलेल्या रकमेची थकबाकी असल्यास किंवा त्यांची नियमित परतफेड केल्यासही शेतक-यांना लाभ देण्यात येणार आहे. सदर कर्जमाफी योजनेचा राष्ट्रीयकृत बॅंका, खाजगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शेतक-यांना दिलेल्या कर्जास लागू राहील.

राजमाची धबधबा

राजमाची धबधबा

सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणाऱ्या डोंगररांगेमुळे निर्माण झालेला परिसर ‘उल्हास नदीचे खोरे’ म्हणून ओळखला जातो.याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते.याच ‘उल्हास नदीच्या खोऱ्यांच्या प्रदेशात मुंबईपुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस १५ कि.मी अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे.कल्याणा नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे.या बंदरापासून बोरघाटमार्गेपुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग.जसा नाणेघाट तसा बोरघाट,त्यामुळे या मार्गावरूनही मोठा प्रमाणात वाहतूक चालत असे.या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसूलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे.यापैकी सर्वात प्रमुख’ किल्ले राजमाची.किल्ल्याचा भौगोलिक दृष्टा विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाक चा किल्ला, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्टया एक प्रमुख ठाणं असले पाहिजे. किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय.

मार्लेश्वर धबधबा

मार्लेश्वर धबधबा

रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून १८ किमी अंतरावरील मारळ या गावाजवळ हा मार्लेश्वरचा धबधबा आहे. पश्चिम घाटातील एक अत्यंत प्रेक्षणीय असे हे स्थळ आहे.

मार्लेश्वरला जाण्यासाठी एस.टी.ची सुविधा उपलब्ध आहे. तसेच खाजगी वाहनानेदेखील जाता येते. कोल्हापूरहून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा येथून खडीकोळवण मार्गे मार्लेश्वर सुमारे २० किमी आहे, तर रत्‍नागिरीहून वा मुंबईहून येताना देवरुखहून हातीव मार्गे सुमारे १८ किमी अंतरावर आहे. पावसाळ्यात अनेक लहान मोठे धबधबे या मार्गावर कोसळत असतात.